महाबळेश्वर मधील आकर्षण पर्यटन स्थळे

महाबळेश्वर, महा म्हणजे महान, बळ म्हणजे शक्ती, आणि ईश्वर म्हणजे देवता, म्हणजेच महान शक्ती चे देवता भगवान शंकर. तसे आपल्या सर्वांना माहिती आहे की,महाबळेश्वर हे ठिकाण,त्या ठिकाणी असलेले उंच उंच डोंगर,स्ट्रॉबेरी, बोटी, आणि प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. जे महाराष्ट्र सातारा जिल्हा पासून लगभग 50 किलोमीटर अंतरावर आहे.आणि पुणे पासून त्याची दुरी लगभग 120 किलोमीटर, मुंबई पासून त्याची दुरी लगभग 260 किलोमीटर एवढी आहे.
त्या ठिकाणीं असलेले हवामान आणि सुंदर, सूर्यास्त बिंदू पर्यटकांना आकर्षित करते. या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोतम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी . महाबळेश्र्वर हे एक प्राचीन मंदिराचे ठिकाण आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिरे 800 वर्षापूर्वीचे असून, शिवलिंग 1000 वर्षापूर्वीचे आहेत.
पंचगंगा मंदिर.

कृष्णा, कोयन, वेण्णा, सवित्री आणि गायत्री या पाच नद्याचा संगम या पंचंगगा मंदिरामध्ये होतो.13 व्या शतकात राजा सिंघेदेव यांनी हे मंदिर बांधलेल होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी या मंदिराचा विकास केलेला होता.तसेच मंदिराच्या आत मधून आपल्याला श्री कृष्णाची मूर्ती, शिवलिंग, आणि पंचगंगा नदीचा संगम पाहायला मिळेल.
पंचगंगा मंदिरामध्ये एक कुल बघायला मिळेल ,ते एक साथ नद्यांचा उगम स्थान आहे. त्यातील पाच नद्यांचा उगम वर्षातून बाराही महिने होतो. परंतु या दोन नद्या भागीरथी आणि सरस्वती आपल्याला मर्यादीत वेळेतच जलरुपात तिकडे येऊन मिळतात. भागीरथी नदी ही बारा वर्षातून एक वेळा बघायला मिळेल. तसेच सरस्वती यां नदीचा संगम साठ वर्षांतना एक वेळा पर्यटकांना बघायला मिळतो. या पाच प्रवाह कलाकृती चे उगम स्थानांना एकत्र करून त्या मधील पाणी गोमुखातून कुंडात सोडले जाते.
पंचगंगा मंदिरात एक कृष्णाची मूर्ती आहे. ती स्थानिक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध करते. महाबळेश्र्वर ला येणारे बरेच पर्यटक जळकुंडमय ला स्पर्श करण्याचा बरोबरच भगवान कृष्णाच्या मूर्तीचा आशिर्वाद घेणे नाही विसरत.पंचगंगा मंदिरा बाहेर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली रुद्रश्र्वर व रुद्रतीर्थ मंदीर आहे.पंचगंगा च्या टेकडीवर 1665 मध्ये रामदास स्वामी नी बांधलेले शेणाच्या मारुतीची मूर्ती आहे.एवढेच क्षेत्र महाबळेश्वर हे पौराणिक आणि ऐतिहासिक काळात धार्मिक आणि सामाजिक दुष्टीने महत्वाचे बनले आहे.
अतीबळेश्र्वर मंदिर.

पौराणिक माहितीच्या अनुसार रावण जो शंकर महादेवाचा अन्यना भक्त होता. त्याने आपल्या कठोर तपश्चर्या ने भगवान शंकर ला प्रसन्न करून लिंग रूंप मध्ये लंका घेऊन जाण्याचे वरदान मागितले.रावण जेव्हा शिवलिंग घेऊन सह्याद्री पर्वताच्या रांगावरून जात होता. तेव्हा लिंग मधील पाण्याचे काही बुंदे खाली पडल्याने महाबळ आणि अतीबळ या दोन राक्षसाचा जन्म झाला.
उपात्या कळपात महाबळ आणि अतीबळ या दोन राक्षस बंधूंनी त्रीभुवनात सर्वांवर अत्याचार करून सर्वांना त्राही त्राही करून सोडले. तसेच ऋषी मुनीवर वर देखील अत्याचार करू लागले.परेशान ब्रह्म भगवान श्री विष्णू कडे पोहचले. व भगवान विष्णूने अतीबळाचा वध केला. परंतु महाबळाचा वध करण्यात असफल राहिले.तेव्हा सर्व देवतांनी प्रार्थना करून महाबळास मोहित केले. तेव्हा महाबळाने देवांकडे मला तुमच्या हातूनच मृत्यू यावा असा वर मागितला. प्रत्यक्ष महाबळाने याचक म्हणून समोर पाहिल्यावर तसा वर देवाने महाबळास दिला.परंतु आमच्या सर्वांच्या नावाने आमचे आस्तित्व येथे राहावे, अशी ईच्छा महाबळाने प्रकट केली. ती देवाने मान्य केली.
महाबळाच्या नावाने श्री. शंकर, अतीबळाच्या नावाने श्रीै. विष्णू, व त्यांच्या कोटी सैन्याच्या नावाने श्री. ब्रह्मा , या प्रकारे श्री. महाबळेश्र्वर, श्री. अतीबलेश्वर, श्री. कोटेश्वर अशा त्री गुणात्मक लिंगाच्या नावाने हे स्थान पावन झाले.श्री .महाबळेश्र्वर हे शिवरूप लिंगरुद्राक्ष च्या आकाराचे खडबडीत असे स्वयंभू आहे.
महाबळेश्वर:-तापमान व हवामान.
महाराष्ट्राच्या सातारा जिल्यातील हे एक थंड हवे चे ठिकाण आहे.ऊन्हाळी हंगामात मार्च ते जून या महिन्यात येथे उच्च तापमान असते.सप्टेंबर महिन्यात येथील शहरांमधे मुसळधार पाऊस असतो.महाबळेश्वर 300 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
हे शहर समुद्रसपाटीपासून खूप उंचावर वसलेले आहे.त्या मुळे वर्षभर येथे थंड वातावरण असते.महाबळेश्वरचे हवामान स्टोबेरी साठी योग्य असते ,त्यामुळेच भारतातील ऐकून उत्पादनापैकी 85% स्टोबेरी उत्पादन येथेच होते.
महाबळेश्वर:-भेट देण्याची उत्तम वेळ.
महाबळेश्वरला भेट देण्याची उत्तम वेळ ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान असते.या काळात तेथील वातावरण थंड आणि पर्यटकांना प्रेक्षणीय आणि आनंदमय बनवते.आणि याच काळात तिथे स्टोबेरी या पिकाचा हंगाम होतो.
जुलै ते ऑगस्ट या दरम्यान देखील आपण महाबळेश्वरला ला जाण्याचा विचार करू शकतो. कारण या काळात तेथील शहरामधील वातावरण हिरवेगार आणि निसर्गरम्य वातावरण निर्माण होते ते पर्यटकांना आकर्षित करते.
महाबळेश्वरला: -कसे पोहोचायचे.
महाबळेश्वरला भेट देण्यासाठी आपण ट्रेन किंवा बस ने सहज प्रवास करू शकतो.त्यासाठी आपल्याला या प्रमुख शहरापर्यंत यावे लागेल.मुंबई, पुणे किंवा सातारा. मुबंई पासून महाबळेश्वरला जाण्यासाठी त्याचे अंतर 260 किलोमीटर आहे, पुणे पासून त्याचे अंतर 120 किलोमीटर आहे,तर सातारा पासून 45 किलोमीटर आणि वाई पासून त्याचे अंतर 32 किलोमीटर एवढे आहे.
रेल्वेने:-महाबळेश्वरला जाण्यासाठी रेल्वने आपण सहज पोहचू शकतो. त्यासाठी आपल्याला सातारा रेल्वे स्टेशन ,पुणे रेल्वे स्टेशन किवा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन या पैकी एका रेल्वे स्थानकावर येऊन ,आपल्याला डायरेक बस किंवा टॅक्सी करून महाबळेश्वर पर्यंत पोहचू शकतो.
सातारा रेल्वे स्टेशन वर येऊन ,तिकडून टॅक्सी किराये वर घेऊन महाबळेश्वरला जाऊ शकतो.टॅक्सी वाले आपल्या कडून 250ते 500 च्या मध्ये 1ते 1:30 तासामध्ये आपल्याला महाबळेश्वर पर्यंत पोहचू शकतात.
विमानतळ: जर आपल्याला विमानाने महाबळेश्वरला जायचे असेल ,तर आपल्याला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ,किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्टीय विमानतळ मुबंई या ठिकाणी येऊन डायरेक बस किंवा टॅक्सी करून आपण महाबळेश्वर पर्यंत पोहचू शकतो.
पुणे आंतराराष्ट्रीय विमानतळ पासून महाबळेश्वर हे अंतर 120 किलोमीटर आहे,आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळ पासून महाबळेश्वर हे अंतर 270 किलोमीटर एवढे आहे.
महाबळेश्वर :-हॉटेलस् अँड रेस्टोरेंट.
रेस्टोरेंट ची नावे | पत्ता | रेंटिग |
त्रीबो ट्रेंड प्रिन्स पॅलेस | मेन रोड भिलर निअर् ,पंचगणी -महाबळेश्वर रोड. | 1500/- |
त्रीबो ट्रेंड शिवाय रिसॉर्ट | लिंगमला कॉर्नर ,पंचगणी -महाबळेश्वर रोड. | 1800/- |
त्रीबो ट्रेंड हॉटेल नक्षत्र कॉटेजस् | पंचगणी -महाबळेश्वर रोड ,निअर् म्याप्रो गार्डन. | 1700/- |
हॉटेल महाबळेश्वर फ्रँग्रन्स् | धागरवाडी, महाबळेश्वर निअल् मॅप्रो गार्डन. | 2000/- |
हॉटेल मालास् | रोवेन् रोड निअर् ,पंचगणी -महाबळेश्वर | 1700/- |
वल्लेय्वुद रिसॉर्ट | मेटगुटेड,महाबळेश्वर | 1700/- |
हॉटेल व्यंकटेश | 141,मेन रोड,निअर् पोलीस स्टेशन ,महाबळेश्वर | 1500/- |
माऊंट व्ह्यु एक्झिक्युटिव्ह | माहु दम रोड, गणेशपेठ,पंचगणी . | 1200/- |
प्रताप हेरिटेज | वल्ले व्ह्यु रोड ,महाबळेश्वर | 1500/- |
हॉटेल पूनम | अॅमजी रोड,कवासाजी स्ट्रेट, महाबळेश्वर. | 1500/- |
महाबळेश्वर:-भेट देण्याची सर्वोत्तम ठिकाणे.
कॅनॉट शिखर:-

कॅनॉट शिखर हे ठिकाण महाबळेश्वर चे दुसरे सर्वात उंच ठिकाण आहे.हे शिखर समुद्रसपाटीपासूनची 1400 मीटर एवढ्या उंचीवर आहे.महाबळेश्वर मधून कॅनॉट शिखर हे ठिकाण महाबळेश्वर मधील साधारणता 5 किलोमीटर अंतरावर आहे.
कॅनॉट शिखर या ठिकाणाहून वेण्णा तलाव ,प्रतापगड किल्ला आणि कृष्णा खोऱ्यातील विसमय कारक दृश्य पाहायला मिळतील. महाबळेश्वर मधील दुसरे सर्वात उंच असलेले हे ठिकाणाला पूर्वी ऑलिंपिक नावाने ओळखले जायचे.
लॉडविक पॉइंट:-

लॉडविक पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख ठिकाणामधील एक आहे.हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 4000 फूट इतक्या उंचीवर आहे.ब्रिटिश अधिकारी जनरल लॉडविक यांच्या नावावरुन याला लॉडविक पॉइंट असे म्हटले जाते.कारण सर्वप्रथम या टेकडीवर चढणारे पहिले अधिकारी हे जनरल लॉडविकच होते.जनरल लॉडविक याच्या स्मरणार्थ त्याच्या मुलाने 25 फुटाचा स्तंभ बांधला आहे.
मॅप्रो गार्डन:-

मॅप्रो गार्डन हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख आणि आकर्षण ठिकाणातील एक आहे .हे ठिकाण महाबळेश्वर पासून जवळपास 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.इ.स.1980 मध्ये ही जागा मॅप्रो ने बांधली असून या जागेची संपूर्ण काळजी मॅप्रो द्वारे घेतली जाते.या ठिकाणी असलेले सुंदर दृश्य आणि मोहीम बघण्यासारखे असतात.मॅप्रो गार्डन हे ठिकाण तेथे असलेल्या स्वादिष्ट स्टोबेरी साठी ही ओळखले जाते.
लिंगमळा धबधबा: –

लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर मधील सुंदर धबधबा म्हणून ओळखला जातो.निसर्गरम्य वातावरण ,आणि खडकाळ डोंगरात् असलेला हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.लिंगमळा धबधबा हा जवळपास 600 फूट उंचीवरून खाली झेपावतो.या धबधबावरून उंचावरून पडणारे पाणी पर्यटकांचे मन मोहून घेते.महाबळेश्वर पासून हा लिंगमळा धबधबा जवळपास 8 किलोमीटर एवढया अंतरावर आहे.फोटोग्राफीची छंद असलेले बरेच पर्यटक पावसाळा मध्ये लिंगमळा धबधबा ला भेट देण्यासाठी येत असतात.
विल्सन पॉइंट: –

विल्सन पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख ठिकाणातील एक आहे.महाबळेश्वर मधील सर्वात उंच पर्यटन स्थळ म्हणून विल्सन पॉइंट कडे बघितल जाते.विल्सन पॉइंट मधील सुर्यदय् आणि सूर्यास्त मधील सुंदर आणि आकर्षण दृश्य पाहायला मिळतील. महाबळेश्वर पासून विल्सन पॉइंट हे ठिकाण जवळपास 2 ते 3 किलोमीटर एवढया अंतरावर आहे.विल्सन पॉईंट ला सनराइजर्स पॉईंट म्हणूनही ओळखले जाते.
एलिफंट्स हेड पॉईंट:-

एलिफंट्स हेड पॉईंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे .हे ठिकाण हुबेहूब हत्तीच्या तोंडासारखे दिसते.त्याचबरोबर या ठिकाणाला निडल हेड पॉईंट असेही म्हटले जाते. तसेच सह्याद्रि पर्वतरांगांमध्ये सुंदर व् आकर्षण दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.पावसाळ्यात हा एलिफंट्स हेड पॉईंट हे ठिकाण संपूर्णतः हिरवेगार वातावरणानी बहरलेले असते.
अर्थर् सीट पॉईंट :-

अर्थर् सीट पॉईंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख आकर्षण स्थळांपैकी एक आहे.अर्थर् सीट पॉईंट हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास 1470 मीटर उंचीवर स्थित आहे.अर्थर् सीट पॉईंट ला बिंदूची राणी म्हणूनही ओळखले जाते. त्याचबरोबरच या पॉईंट अर्थर् मालेड या नावावरून नाव देण्यात आले.अर्थर् सीट पॉईंट हे ठिकाण महाबळेश्वर पासून जवळपास 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
महाबळेश्वर मंदिर :-

महाबळेश्वर मंदिर हे सातारा जिल्यातील एक प्राचीन मंदिर आहे.हे मंदिर भगवान् शंकराला समर्पित आहे.हे मंदिर 16व्या शतकात राजा चंदाराव मेल यांनी बांधले होते.या आकर्षण आणि सुंदर मंदिरामध्ये भगवान शंकराचे एक शिवलिंग आहे.त्याचबरोबर हे मंदिर डोंगरांच्या मधोमध असल्याने या ठिकाणाचे दृश्य अतिशय सुंदर असते.महाबळेश्वर पासून हे मंदिर जवळपास 6 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
वेण्णा तलाव: –

वेण्णा तलाव हे ठिकाण महाबळेश्वर मधील प्रमुख आणि आकर्षण ठिकाणातील एक आहे.हे ठिकाण मानवनिर्मित असून महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय तलावपैकी एक आहे.हा तलाव साताऱ्यातील राजे श्री.अप्पासाहेब महाराजांनी बांधला होते .हा संपूर्ण तलाव गवत आणि झाडानी वेढलेला आहे.महाबळेश्वर पासून वेण्णा तलाव हा जवळपास 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
प्रतापगड किल्ला:-

प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर मधील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 1000 उंचीवर असलेला हा किल्ला एक एतिहासिक किल्ला आहे.इ.स.1656 मध्ये मराठेशाहीत राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्लाचे निर्माण केले होते. हा किल्ला ऐतिहासिक दृष्टया खूप महत्वाचा किल्ला आहे. कारण याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान याच्या मध्ये युद्ध झाले होते.
Woww, छान आहे पोस्ट, 👍अशाच अनेक भारतीय संस्कृतीत असलेल्या मंदिराची माहिती वाचायला आणि पाहायला नकीच आवडेल.